एकटीच बसून कधी तरी…
आयूष्य आहे तरी काय ह्याचा विचार करत होते…
सहज लागला डोळा अंधारात…
अन… स्वप्नात मी रमले होते…
हळूच आली झुळूक वाऱ्याची…
उडाला पक्षांचा थवा…
झाली पानांची सळसळाट …
जणू होता नवीन सोहळा …
नभात ढग दाटून आले….
तुटले थेंबाचे आकाशाशी नाते …
जणू कुणीच नव्हते त्याला भ्राते …
एकटाच पडला…
जोरात धडकला …
वाटले त्याला जणू जगच संपले …
डोळे उघडून पाहतो तर…
जीवनाला नवीन फुटले होते फाटे …
थेंबाचे जीवन बदलले होते …
आकाश तर कायम चे दुरावले होते…
पण … नवीन काही तरी गवसले होते…
सगळ काही नवीन होत …
परिचयाच्या पलीकडे वाटत होत…
काही कळण्या आधी …
त्याने तेही हरवल…
सुंदरश्या हिरव्या कोमल पानाच्या स्पर्शा पासून तुटून …
ते इवलसं जीव पुन्हा घाबरल होत…
काही कळायच्या आत… ते कठीण दगडावर आपटलं होत…
कधी न पाहिलेलं …
कधी न वाटलेलं …
क्रूर वागण त्याला मिळालं होत…
जिथून जागा मिळेल …
जिथून नाजूक वाट मिलेल…
तिथून रस्ता बनवत होत …
कधी स्वताः चा अंश तुटून …
तर कधी नवीन थेंबाला भेटुन …
ते मिळेल त्या रस्त्याने वाहत होत…
आयूष्य नेयील तिकडे संघर्ष करत…
अस्तित्व टिकवत ते धावत होत…
कधी मातीत मिसळून विद्रूप होत होतं …
तरी थांबून न रहाता …
जीवाचा आकांत करत धावत होत…
शेवटी मातीचे कण आडोश्याला थांबत होते…
पण थेंबाला त्याचे नशीब विसावू देत नव्हते…
त्याच्या चिकाटी पुढे सगळे थकून वाट सोडत होते…
प्रगती ने कधी हाय से वाटत होते…
तर कधी दुसर्या क्षणी …
नवीन आव्हान त्याला थांबवू बघत होते…
मी कित्ती सुखात होतो आकशात…
ते सहज कधी कधी म्हणत होते…
पण …
त्याने कधीच आकाश सोडले होते…
पुन्हा आकाशी जायचे कसे ते मात्र कळत नव्हते…
समोर येणाऱ्या संकटाना पाहुन…
अस्तित्व टिकवणे त्याला ओघाने आले होते…
थांबून विचार करणे त्याच्या नशिबी लिहिलेच नव्हते…
रडत बसून स्वतः चे विभागणे त्याला झेपणारे नव्हते…
आयुष्य त्याला थांबूच देत नव्हते…
पण ह्या सर्व प्रवासात …
मी हळू हळू सक्षम आणि वीर होतोय हे मात्र त्याला कळू लागले…
इटुकल्या जीवाला धीर गवसला…
सभोवती पाहिले त्याने सहज एकदा …
त्याच्या सारखेच शेकडो थेंब त्याच्या नजरेत पडले …
प्रत्येक थेंब लढत होता…
येईल त्या प्रसंगाला सामोरा जात होता …
स्वतःचा रस्ता बनवत होता…
आला धीर त्या जीवाला …
ठरवले त्याने सर्वां सोबत धावायचे …
बघता बघता त्याला कळले…
कि सर्व अडथळे त्यांना नदी म्हणू लागले होते…
स्वताः बाजूला होऊन वाट देऊ लागले होते…
थेंबाला झाला हर्ष …
म्हणे… आत्ता नाही कुणी रोखणार माझा मार्ग…
मित्रांसोबत घेतला वेग…
धाऊ लागला सुसाट थेट …
मार्गात भेटल्या नद्या अनेक…
मिळाले प्रगतीचे अनेक संकेत …
पोहोचला एका नव्या दशेत…
नदी सोडून झाला होता एक महाकाय जल वेश…
मिळाले सागर असे नाव लगेच…
प्रयत्न झाले सार्थ …
मिळाले होते आत्ता सामर्थ्य अन … स्थैर्य …
जाऊन थांबला एकदा सागर तळाशी …
बघत बसला जलचरांची मस्ती …
असाच एक मासा आला …
जोरात पोहत जाऊन वर नाहीसा झाला …
थेंबाला ते कुतूहल भारी …
पाहूया वर काय आहे म्हणाली स्वारी …
धावत मग तो वर गेला …
जाऊन समुद्राच्या लाटेत मिळाला …
गम्मत वाटली जेव्हा तो वर उडाला …
कळले नाही त्याला केव्हा तो नाहीसा झाला …
डोळे उघडून पहिले तो आकाशात मेघ दाटले होते…
पहाट संपायचे वेध लागले होते…
थेम्बाने पुन्हा आकाश गाठले होते …
वाफ होऊन त्याने …
आकाशी जायचे स्वप्न साकारले होते…
मी सहज सुखात हसले …
दुसऱ्या क्षणी पाऊस आला असे वाटले …
पाहते तो स्वप्नात नाहीसे झालेले थेंब,
समोरच्या केतकी च्या पानावर क्षणात ओघळले …
पुन्हा नियतीने त्यांना नवीन जीवन-प्रवासावर पाठवले होते!
डोक्यावर छत्री घेऊन मी माझा मार्ग धरला …
दिसली मग गावाची शांत रम्य वाट …
चालू लागले एकटीच त्यावर शोधत आयुष्याची पहाट …
बघता बघता गर्दी झाली …
सकाळच्या उजेडात माणसे आपापल्या वाटेवर गेली …
पाऊस थांबला …
अन … थेंबानी नवीन नाती शोधत वाट बनवली …
मी हसले…
हेच तर आयुष्य आहे …
हाच तर अर्थ आहे… मला आतून वाटले …
पाउस थांबला होता आत्ता …
मग छत्री केली बंद …
तर…
एक थेंब सहज हसून छत्रीवरून उडाला …
अन मला हसून म्हणाला …
तू चल जा तुझ्या ठरवलेल्या कामाला …
मी जातो मार्ग शोधत पुन्हा आकाशाला…
भेटू पुन्हा असेच कधी तरी …
नव्या वळणाला!!!
--Tanishka Wagh
No comments:
Post a Comment